तीन जिल्ह्यात घरफोडीचे 19 गुन्हे : जळगावातील अट्टल घरफोड्या धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

तीन लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त : सोनगीर हद्दीतील दोन गुन्ह्यांची उकल


19 burglary cases in three districts : Attal burglaries in Jalgaon caught by Dhule Crime Branch धुळे (25 मार्च 2025) : भर दिवसा बंद असलेल्या घरांना टार्गेट करीत घरफोडी करणार्‍या व धुळ्यासह जळगाव व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तब्बल 19 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या कुविख्यात घरफोड्याला धुळे गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीच्या अटकेनंतर सोनगीर पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे. प्रवीण सुभाष पाटील (32, बिलवाडी, ता.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून तीन लाख 18 हजार 595 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना संशयीत प्रवीण पाटीलबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर पथकाने 23 मार्च रोजी संशयीताला ताब्यात घेतले. संशयीताला विचारपूस केल्यानंतर त्याने सोनगीर पोलीस ठाणे हद्दीत दोन गुन्हे केल्याची कबुली देत एक लाख 94 हजारांची रोकड, 23 हजार दोनशे रुपयांचे टॉप्स, 12 हजार 200 रुपये किंमतीच्या सोन्याच्या रिंगा, 39 हजार 195 रुपये किंमतीचे चांदीचे कडे, 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.डी.8142) असा एकूण तीन लाख 18 हजार 595 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक अमित माळी, पोलीस अंमलदार संजय पाटील, संदीप सा.पाटील, पंकज खैरमोडे, संजय हिरे, महेंद्र सपकाळ, सुनील पाटील, विनायक खैरनार आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !