गोवंश कत्तलीचा प्लॅन : जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा


न्युज डेस्क । जळगाव (26ी मार्च 2025) : चारा पाण्याची कोणतीही सोय न ठेवता गोवंश जातीचे पाच बैलांना कब्जात ठेवले होते. या बैलांचा कत्तल करण्याचा उद्देश असल्याच्या गोपनीय माहितीनुसार एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी सकाळी 11 वाजता मिल्लत हायस्कुलच्या बाजुला रिलायन्स पंपाच्या पाठीमागे कारवाई केली. या प्रकरणी मजहर खान सुजत खान (वय 34,रा. पिंप्राळा,हुडको) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याच्याकडे 47 हजार किमतीचे पाच गोवंश मिळुन आले. या प्रकरणी प्राण्यांना निर्दयतेपणे वागणूक कायदा व प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला.पोलीस नाईक हेमंत जाधव हे तपास करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !