जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील 45 दुचाकींचा उद्या जाहीर लिलाव
जळगाव (26 मार्च 2025) : जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकूण 45 बेवारस मोटारसायकली पडून आहेत. या दुचाकींचा जाहीर लिलाव गुरुवारी (27 मार्च) सकाळी 11 वाजता होत आहे. नागरिकांना या लिलावात सहभागी होता येणार आहे.
ज्या कोणाची मोटारसायकल हरवली असेल त्यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला येऊन संपर्क साधावा. तसेच काही मोटारसायकलींचे चेचिस नंबर आणि इंजिन नंबर खोडलेले आहेत. त्यामुळे मोटारसायकल मालकाचा शोध लावण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या बेवारस दुचाकींच्या लिलावास वरिष्ठ अधिकार्यांची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रिया राबविली जात आहे.

त्यानुसार गुरुवारी (27 मार्च) सकाळी 11 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाणे आवारात या गाड्यांचा लिलाव होणार आहे. ज्या नागरिकांना या लिलावात सहभाग घ्यावयाचा असेल, त्यांच्यासाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकून यांच्याकडे निविदा फॉर्म उपलब्ध आहे. निविदा फॉर्म भरून पाठविण्याची शेवटची तारीख गुरुवार, 27 मार्च सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हापेठ पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.




