जळगावात भामट्यांनी हातचलाखीने महिलेकडील 12 हजार लांबवले
जळगाव (26 मार्च 2025) : भामट्यांनी हातचलाखीने महिलेकडील 12 हजार 200 रुपयांची रोकड लांबवली. जळगाव शहरातील नवीपेठ येथील पंजाब नॅशनल बँकेबाहेर हा प्रकार मंगळवार 25 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता घडला. याप्रकरणी दुपारी साडेचार वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले नेमके
सुनीता साहेबराव सोनवणे (33, रा. पिंप्राळा, जळगाव) या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार, 25 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता त्या जळगाव शहरातील नवीपेठ येथील पंजाब नॅशनल बँकेजवळ आल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळील 12 हजार 200 रूपयांची रोकड हातचालाखी करून लांबवली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र माहिती घेतली परंतू कोणती माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दुपारी साडेचार वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार किशोर निकुंभ करीत आहेत.




