युक्रेनमध्ये एमबीबीएस प्रवेशाचे आमिष : डॉक्टरला लावला साडेसात लाखांचा गंडा


Bait of MBBS admission in Ukraine : Doctor duped of Rs 7.5 lakh जामनेर (26 मार्च 2025) : युक्रेनमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका डॉक्टरांची सात लाख 30 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सुनील बाबू चव्हाण (52, रा. कापूसवाडी, ता.जामनेर) हे वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांच्या मुलाला युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन महेश शांताराम वाघमारे (रा. मुंबई), राहुल शर्मा आणि प्रेरणा कौशिक (रा. दिल्ली) या तिघांनी दिले होते. या तिघांनी संगनमत करून सुनील चव्हाण यांच्याकडून एकूण सात लाख 30 हजार रुपये घेतले आणि त्यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनील चव्हाण यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील करत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !