आरक्षित तिकीटांचा काळाबाजार करणार्‍या मुकटीतील संशयीताला अटक : पावणेदोन लाखांची तिकीटे जप्त


चाळीसगाव (29 मार्च 2025) : संशयास्पद युजर आयडीच्या मदतीने तिकिटे काढून ती ब्लॅकमध्ये विक्री करणार्‍या धुळे जिल्ह्यातील मुकटीतील संशयीतावर पुणे सायबर सेलने कारवाई करीत सुमारे पावणेदोन लाखांची तिकीटे जप्त केली आहेत. ज्ञानेश्वर गुलाब पाटील (38, रा.मुकटी, ता.धुळे) असे संशयीताचे नाव आहे.

बुधवार, 26 मार्च रोजी पुणे सायबर सेलकडून रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या काळाबाजारामध्ये संलग्न असलेल्या संशयिताबाबत माहिती मिळाल्यानंतर रेल्वे संरक्षण दल चौकी, धुळे अंतर्गत चाळीसगाव येथे गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष तपास पथकाने आरोपीकडून 243 ई-तिकिटे जप्त केली आहेत.


एक लाख 78 हजार 213 रुपये किंमतीची 88 आगाऊ प्रवासाची तिकिटे तसेच 155 प्रवास पूर्ण झालेली तिकिटे (किंमत दोन लाख 42 हजार 748 रुपये) आहे. अवैध तिकिट बुकिंगसाठी वापरलेला रेडमी कंपनीचा मोबाइल फोन देखील जप्त करण्यात आला.

याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून नोटीस देऊन त्याला सोडण्यात आले आहे. ही कारवाई चाळीसगाव निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली, एसआयपीएफ आर. के. सिंग, राजेंद्र भामरे व आरक्षक राकेश खलाणे यांच्या विशेष पथकाने केली. सहायक उपनिरीक्षक राजेंद्र भामरे अधिक तपास करीत आहेत.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !