जोडी शोभत नाही म्हणताच भावी वधूने उचलले टोकाचे पाऊल
जामखेड (30 मार्च 2025) : लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन व आयुष्यभराचा सहवासही मात्र या आयुष्याच्या या टप्प्यावर लग्न जमल्यानंतर भावी वराने नियोजित वधूला आपली जोडी शोभत नसल्याचे म्हणताच वधूने आत्महत्या केली. याप्रकरणी मुलासह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये घडली.
जामखेड तालुक्यातील मोनिका सतीश सुरवसे हिचा विवाह कर्जत येथील महेश मेंगडे याच्याशी जमला होता. मात्र लग्न जमल्यानंतर ’तू मला आवडलेली नाही, मला तू मॅच होत नाही, आपली जोडी शोभून दिसत नाही, असे म्हणत महेशने मोनिकाचा वारंवार अपमान केला. एवढेच नाही तर मुलाची आई आरोपी अनुजा दत्तात्रय मेंगडे व मुलाचे वडील दत्तात्रय पांडुरंग मेंगडे यांनीही ’तुमची मुलगी आमच्या मुलाला शोभून दिसत नाही’ मोनिकाच्या वडिलांना सांगितले आणि ठरलेले लग्न मोडले.

लग्न मोडल्याच्या मानसिक त्रासामुळे मोनिकाने डिसलेवाडीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील सतीश दादासाहेब सुरवसे यांनी गुजामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून महेश दत्तात्रय मेंगडे, अनुजा दत्तात्रय मेंगडे व दत्तात्रय पांडुरंग मेंगडे (रा.कर्जत, जि.अहिल्यानगर) अशा तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.




