जळगाव जिल्ह्यात दोन तरुणांसह तरुणीने उचलले टोकाचे पाऊल


A young woman took an extreme step with two young men in Jalgaon district जळगाव (31 मार्च 2025) : विविध कारणांमुळे जळगाव जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या दिवशीच दोन तरुणांनी गळफास घेतला तर दुसर्‍या एका घटनेत मामाकडे आलेल्या तरुणीने जीवनयात्रा संपवली. लक्षीत राजेंद्र वाघुळदे (22, रा.यशवंत नगर, जळगाव) व महेश ज्ञानेश्वर पाटील (24, रा.कुसुंबा, ता.जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

उच्च शिक्षीत तरुणाचे टोकाचे पाऊल
लक्षीत वाघुळदे हा तरुण पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता तर त्याचे वडील सेंट जोसेफ शाळेत शिक्षक आहे. सध्या सुट्टी असल्यामुळे लक्षीत हा काही दिवसांपूर्वी घरी आला होता. रविवारी तो घरातील वरच्या मजल्यावर एकटाच असताना त्याने गळफास घेतला. त्याचे कुटुंबीय त्याला बोलविण्यासाठी गेले असता, तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मयत घोषित केले.


चटई कर्मचार्‍याची आत्महत्या
दुसर्‍या घटनेत महेश ज्ञानेश्वर पाटील (24, रा.कुसुंबा, ता.जळगाव) हा एमआयडीसीतील एका चटई कंपनीत कामाला होता. घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याने गळफास घेतला. पुरण पोळी करायचे खापर घेण्यासाठी त्याची आई त्या शेडमध्ये गेल्यानंतर त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

पोलिस पाटील राधेश्याम चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी मयत घोषित केले. महेशच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, या दोन्ही काल रविवारी, गुढीपाडव्याच्या दिवशीच घडल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मामाकडे आलेल्या तरुणी संपविले जीवन
पारोळा तालुक्यातील भोंडण येथे मामाकडे आलेल्या नाशिक येथील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार. 28 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. पायल संतोष शिंदे (18, रा.पाथर्डी फाटा, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तरुणीचे मामा सतीश सुखदेव सोनवणे (रा. भोंडण) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !