रावेर तालुका हादरला : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून

आभोडा गावातील घटना : पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर


रावेर (31 मार्च 2025) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील अभोडा गावात सोमवारी सकाळी घडली. खुनानंतर संशयीत तथा पती रावेर पोलिसात हजर झाला. आशा संतोष तायडे (38, रा.आभोडा, ता.रावेर) असे खून झालेल्या विवाहितेचे तर संतोष शामराव तायडे असे अटकेतील आरोपी पतीचे नाव आहे.

संशयातून आवळला गळा
रावेर तालुक्यातील आभोडा गावात आशा तायडे ही विवाहिता पती संतोष शामराव तायडेसह वास्तव्यास होती. शेती व मजुरीचे काम करून कुटूंब आपला उदरनिर्वाह करीत होते. संतोष तायडेला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता शिवाय तिच्याकडे असलेले पैसे तिने कुणाला दिले हे सांगण्यासाठी ती टाळाटळ करीत असल्याने रविवारी घरातील सर्व कामे आटोपून रात्री आशा झोपल्यानंतर आरोपी पतीने सोमवारी पहाटे 3.30 ते चार वाजेच्या सुमारास दोन्ही हाताने गळा दाबून पत्नीची हत्या केली. खुनानंतर आरोपी पतीने सकाळी आठ वाजता रावेर पोलीस ठाणे गाठत पत्नीच्या हत्येची माहिती दिली.


अधिकार्‍यांची घटनास्थळी भेट
रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, उपनिरीक्षक दीपाली पाटील, पोलीस हेड कॉस्टेबल ईश्वर चव्हाण, कॉस्टेबल कल्पेश आमोदकर, मुकेश मेढे, संदीप पाटील, अतुल गाडीलोहार यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी भेट देऊन पोलिसांना तपास कामाबाबत निर्देश दिले. याबाबत पोलीस पाटील राजू नुरखा तडवी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या खरेदीवरून आरोपी संतोष तायडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !