मनुदेवी मंदिरावर चैत्र नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरवात


Chaitra Navratri festival begins with enthusiasm at Manudevi temple यावल (1 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील आडगावपासून जवळच असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी घट स्थापना करण्यात आली. चोपडा आमदारांच्या उपस्थितीत आरती पार पडली व येथे नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली. चैत्र पाडवा म्हणजेच नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस येथे मानला जातो. दरवर्षी येथे चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतो.

आमदार दाम्पत्याच्या हस्ते आरती
सातपुड्याच्या कुशीत आडगाव, ता.यावल गावापासून जवळच असलेल्या सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचे मंदिर आहे. या मंदिरावर सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील चैत्र पाडव्याच्या दिवशी रविवारी चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. या ठिकाणी घटस्थापना डॉ.देवेन पाठक व दिव्या पाठक तसेच सतीश पाटील व सरला पाटील या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली.




या ठिकाणी आरती चोपडा आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे या दाम्पत्याचे हस्ते पार पडली. संपूर्ण धार्मिक विधी व पूजा अर्चा दगडू महाराज यांच्या उपस्थितीत पार पडली. या संपूर्ण नवरात्र उत्सवाकरिता मंदिर संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील, शिवाजी पाटील, सतीश पाटील, नितीन पाटील, विश्वदीप पाटील हे परिश्रम घेत आहे. चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस या ठिकाणी यात्रा उत्सव साजरा केला जाणार आहे. सातपुड्याच्या कुशीत दर्शनासाठी नऊ दिवस भाविक, भक्तांची गर्दी राहणार आहे.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !