दुचाकीचे चाक पायावरून गेल्याने कोयत्याने मारहाण : तीन संशयितांना अटक
Man beaten with a reverse scythe after a two-wheeler wheel went over his foot : Three suspects arrested जळगाव (1 एप्रिल 2025) : धावत्या दुचाकीने रस्त्यावर उभ्या तरुणाच्या पायावरुन चाक नेल्याने दुखापत झाली होती. याचा जाब विचारताच राहुल सोनवणे या तरुणाला चौघांनी मारहाण केली. तसेच एकाने उलटा कोयता खांद्यावर मारत दुखापत केली. ही घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सुरेशनगर महाबळ साई विहार अपार्टमेंट नजिक घडली.
या प्रकरणी तक्रारीनुसार बंडु उर्फ राजेश दिनेश परदेशी, रोहीत दिनेश परदेशी, नितीन संतोष सोनवणे, गणेश बुधवा सोनवणे (सर्व रा.समतानगर) यांच्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे तपास करीत आहेत. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.





