जळगावातील गुरुव्दारासमोरून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
जळगाव (1 एप्रिल 2025) : जळगाव : शहरातील गुरुव्दारा गुरसिंग सभाच्या मेनगेटच्या बाजुला लावलेली मोपेड दुचाकी चोरट्याने लांबविली. या प्रकरणी रविवारी (30 मार्च) जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
वसंतकुमार नांदकराम बतरा (51, रा.स्टेट बँक कॉलनी) हे व्यावसायीक आहेत. त्यांच्या मालकीची सुमारे वीस हजार किमतीची एक्टिवा (एमएच 19 बीआर 6184) मोपेड गुरुव्दारा गेटजवळुन चोरट्याने चोरुन नेली. गुरुवारी (27 मार्च) सायंकाळी सात ते 8.45 वाजेच्या सुमारास ही घटना शहरातील गुरुव्दारा गुरसिंग सभाच्या मेनगेटजवळ घडली. पोलीस नाईकम राजेश पदमर हे तपास करीत आहेत.





