रुममध्ये प्रवेश करत मोबाईल लांबवला : जळगावातील घटना
जळगाव (1 एप्रिल 2025) : एघड्या दरवाजातून रुममध्ये प्रवेश करत चोरट्याने सुमारे सात हजार आठशे रुपयांचा मोबाइल तसेच वॉच असा सुमारे 8300 रुपयांचा विद्यार्थ्याचा मुद्देमाल चोरुन नेला. जुना खेडी रोड परिसरातील साईगिता नगरात ही घटना रविवारी (30 मार्च) सकाळी उघडकीस आली.
या प्रकरणी अमित सुधाकर चौधरी (वय 28,रा. नेहरुनगर वाडा जि.पालघर हमु साईगितानगर) हा विद्यार्थी शिक्षण घेत असुन सकाळी त्याच्या उघड्या दरवाजातून चोरट्याने रुममध्ये प्रवेश केला. व मोबाईल, घड्याळ घेत पसार झाला. या प्रकरणी तक्रारीनुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक मुबारक तडवी करीत आहेत.





