जळगावात चोरटे शिरजोर : अपार्टमेंटमधुन दुचाकी लांबवली
Thieves on the run in Jalgaon : Bike stolen from apartment जळगाव (1 एप्रिल 2025) : शहरातील जुना खेडी रोडवरील स्वप्निल अपार्टमेंटच्या पार्किंगमधुन सुमारे 50 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर चोरट्यांनी चोरुन नेली. रविवारी (30 मार्च) रोजी रात्री ही घटना घडली.
हर्षल राजेंद्र पाटील (वय 36 मुळ रा. अट्रावल ता.यावल, हमु स्वप्निल अपार्टमेंट) हे जैन इरिगेशन बांभोरी येथे कामाला जातो. अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये त्यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी (एम.एच.19 बी.एल.3326) लावली होती.चोरट्याने ती चोरुन नेली. तक्रारीनुसार याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार रवींद्र बोदवडे हे तपास करीत आहेत.





