मुक्ताईनगरात 445 किलो गोमांस जप्त : त्रिकूटाला अटक
मुक्ताईनगर (2 एप्रिल 2025) : मुक्ताईनगर पोलिसांनी गोमांसाची वाहतूक करताना ओमनी वाहनातून 445 किलो गोमांस जप्त करीत तिघांना अटक केली. धाबे पिंप्री शिवारात ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे पिंपरी शिवारातून अवैधपणे वाहनातून गोमास वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाली. त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी रविवा, 30 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता कारवाई करत ओमनी वाहन (क्रमांक एम.एच.19 वाय.5103) ही रस्त्यावर अडवली. यावेळी या वाहनांमध्ये गोणपाटमध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस आढळले.

पोलिसांनी संशयीत आरोपी मोहम्मद फारुख शेख नसीर मन्यार, आसीफ इब्राहिम कुरेशी (दोन्ही राहणार मुक्ताईनगर) आणि मेहमूद कुरेशी (बर्हाणपूर, मध्यप्रदेश) यांना अटक केली.




