शेगाव-खामगाव महामार्गावर भीषण अपघात : पाच जण जागीच ठार तर 15 जखमी


Fatal accident on Shegaon-Khamgaon highway  न्युज डेस्क । बुलढाणा (2 एप्रिल 2025) : शेगाव-खामगाव महामार्गावर तीन वाहनांची धडक झाल्याने या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 15 जण जखमी झाले. सा जणांची प्रकृती गंभीर आहे. एसटी बस, खासगी प्रवासी बस आणि बोलेरे या वाहनांची धडक होऊन हा तिहेरी अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेगावकडून कोल्हापूरकडे जात असलेली बोलेरो कार पुण्याकडून परतवाड्याकडे जात असलेल्या एसटी बसला धडकली. शेगाव-खामगाव या महामार्गावर झालेल्या सदर अपघातावेळी पाठीमागून येणार्‍या खासगी बसच्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि खासगी बसनेही बोलेरो कारला धडक दिली. या तिहेरी अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाल्याचे समजते.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने खामगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !