जळगावात एटीएम मशीनला आग : दिड लाखांचे नुकसान


जळगाव (2 एप्रिल 2025) : रविवारी मध्यरात्रीनंतर एचडीएफसी एटीएम मशीनच्या गाळ्यास आग लागली होती. या घटनेत एक लाख 51 हजार रुपयांचे नुकसान झाले. छत्रपती शिवाजी नगरातील शिवाजी चौकात ही घटना घडली होती. एटीएम शॉपमध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, असे सांगण्यात आले.

हा प्रकार लक्षात येताच मनपाच्या अग्निशमन विभागाला खबर देण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दलाचे पथक अग्नीशामक बंबासह घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा फवारा मारून ही आग विझविली होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह कर्मचारी हजर होते.








आगीत तीन बॅटरी, डिव्हीआर बॉक्स तसेच इलेक्ट्रिक सामान जळून नुकसान झाले. या प्रकरणी ललित दामू घुले (वय 36, रा. गणराय विहार, शिवपूर-कन्हाळा रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. हवालदार दीपक शिरसाठ हे तपास करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !