भुसावळात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : चार धारदार तलवारींसह त्रिकूटाला अटक

दुसर्‍या कारवाईत भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडून चॉपर जप्त


Major action by Crime Branch in Bhusawal : Trio arrested with four sharp swords भुसावळ (3 एप्रिल 2025) : जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील इंदिरा नगर भागातील त्रिकूटाकडून सहा हजार रुपये किंमतीच्या चार धारदार तलवारी जप्त केल्या. ही कारवाई मंग्ळवार, 1 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास करण्यात आली. तीन्ही संशयीतांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेला इंदिरा नगर भागातील तीन तरुणांकडे धारदार तलवारी असल्याची माहिती मिळाली होती. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पथकाने छापेमारी करीत भरत यादव खंडारे (19, रा.इंदिरा नगर, भुसावळ), सागर अनिल संघवी (20, रा.इंदिरा नगर भुसावळ) व सागर राजू यादव (25, रा.इंदिरा नगर, भुसावळ) यांना अटक करीत त्यांच्याकडील सहा हजार रुपये किंमतीच्या चार तलवारी जप्त केल्या.


यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार कमलाकर बागुल, हवालदार गजानन देशमुख, हवालदार गोपाल गव्हाळे , हवालदार संघपाल तायडे, कॉन्स्टेबल सचिन पोळ आदींच्या पथकाने केली.

बाजारपेठ पोलिसांकडून चॉपर जप्त
बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे संशयीत सलमान उर्फ सलमान टँकर अब्दूल गफ्फार (25, पापा नगर, भुसावळ) व शोयब सिकंदर पिंजारी (गौसिया नगर, भुसावळ) व करन (पूर्ण नाव नाही) यांच्याविरोधात मंगळवारी दुपारी दिड वाजता गुन्हा दाखल करीत त्यांच्याकडून 300 रुपये किंमतीचा धारदार चॉपर जप्त केला. संशयीत सलमान यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची नोटीस बजावून सुटका करण्यात आली. कॉन्स्टेबल अमर अढाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार महेश चौधरी करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !