जळगावात धाडसी घरफोडी : दोन लाख 30 हजाराांचे दागिने लांबवले
Daring house burglary in Jalgaon : Jewellery worth Rs 2.30 lakh stolen जळगाव (3 एप्रिल 2025) : शहरातील भोईवाडा भागातील घरातून दोन लाख 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवण्यात आले. ही घटना बुधवार, 2 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता घडली. याप्रकरणी दुपारी एक वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले नेमके
भरत सुभाष पवार (28, रा.भोईवाडा जळगाव) हा तरुण खाजगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. 27 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान त्याचे घर बंद होते. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरातून सोन्याचा चपलाहार, कानातले टोंगल तसेच सोन्याची मणी असा एकूण 2 लाख 30 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
ही घटना बुधवार, 2 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता समोर आली. ही घटना घडल्यानंतर भरत पवार यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली. त्यानुसार दुपारी 1 वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहे.


