आडगावात विषारी द्रव प्राशन करून 44 वर्षीय प्रौढाची आत्महत्या


44-year-old adult commits suicide by consuming poisonous liquid in Adgaon यावल (4 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील आडगाव गावातील रहिवासी असलेल्या 44 वर्षीय प्रौढाने विषारी द्रव्य प्राशन केले होते. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मंगळवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आडगाव गावातील रहिवासी विनोद मार्तंड कोळी (44) या प्रौढाने आपल्या राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन केले होते. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णाला दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंत बेलदार करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !