घोडसगाव ग्रामपंचायतीच्या सदस्याला गावठी कट्ट्यासह पकडले
जळगाव गुन्हे शाखेची कारवाई ः दहशतीसाठी आणला कट्टा
Ghodasgaon Gram Panchayat member caught with village knife मुक्ताईनगर (4 एप्रिल 2025) : मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव ग्रामपंचायतीच्या सदस्याला गावठी कट्टा बाळगताना जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. अर्जुन जनार्दन कोळी (30, घोडसगाव, ता.मुक्ताईनगर) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
घोडसगाव ग्रामपंचायतीचा सदस्य अर्जुन कोळी याने दहशत निर्माण करण्यासाठी गावठी कट्टा आणल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती त्यावरून पथकाने मुक्ताईनगर रोडवरील प्रतीक टी सेंटरजवळ संशयीताला गुरुवार, 3 रोजी पकडले. संशयीताच्या ताब्यातून 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. रवींद्र कापडणे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहते.

यांच्या पथकाने केली कारवाई
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अशोक नखाते, जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार प्रीतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रवींद्र कापडणे, रवींद्र चौधरी आदींच्या पथकाने केली.




