जळगाव जिल्हा परिषदेत एसीबीची मोठी कारवाई : 15 हजारांची लाच घेताना सहा.जिल्हा आरोग्याधिकारी जाळ्यात


ACB takes major action in Jalgaon Zilla Parishad: Officer caught taking bribe of Rs 15,000 जळगव (4 एप्रिल 2025) : जळगाव जिल्हा परिषदेतील सहाय्यक जिल्हा आरोग्याधिकार्‍याला 15 हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीने अटक केली आहे. एका प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

जयवंत झुलाल मोरे (46, जळगाव) असे अटकेतील सहाय्यक जिल्हा आरोग्याधिकार्‍याचे नाव आहे.




जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात एसीबीच्या पथकाने हा सापळा शुक्रवार, 4 रोजी यशस्वी केला.

लाचखोर हादरले
शासकीय कार्यालयांमध्ये मार्च एण्ड आटोपला असलातरी लाचखोरांसाठी मात्र बिले काढण्यासह विविध कामांसाठी पर्वणी चालून आली आहेत. त्यातच जिल्हा परिषदेतील सहाय्यक जिल्हा आरोग्याधिकार्‍याला लाच प्रकरणात अटक करण्यात आल्याने लाचखोर पुरते हादरले आहेत. एसीबीकने अशाच पद्धत्तीने कारवाईचा सपाटा सुरू ठेवावा, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !