यावलच्या टेंभीकुरण शिवारात केळी व्यापार्यावर हिंस्त्र प्राण्याचा हल्ला
यावल (4 एप्रिल 2025) : यावल तालुक्यात विविध ठिकाणी बिबट्या दिसून येत असल्याच्या चर्चेला मोठे उधाण आले आहे. त्यातच गुरुवारी शहरालगतच्या टेंभी शिवारात एका केळी व्यापार्यावर दुचाकीवरून जात असताना हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला मात्र हा बिबट्याने केल्याचा दावा होत आहे. व्यापार्यांया छाताीवर नखं लागली असून शर्ट असल्याने खोलवर जखम झाली व व्यापारी थोडक्यात बचावला आहे.
अचानक केला हल्ला
शहरातील बाबा नगर भागातील रहिवासी ईरफान खान रशीद खान (52) हे केळी व्यापारी गुरूवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास यावल शहरास लागुन असलेल्या टेंभी कुरण शिवारातील आकाश बाळू पाटील यांच्या शेतातील केळी पाहण्यासाठी आपल्या मोटरसायकलने एकटे जात होते. अचानक शेताच्या दिशेने बिबट्या आला व त्याने केळी व्यापारी ईरफान खान यांच्या छातीवर पंजा मारला, अंगात शर्ट असल्याने नखांची छातीवर खोलवर दुखापत झाली नाही देवाची साथ होती म्हणून या हल्ल्यातून आपण बचावल्याचे केळी व्यापारी खान यांनी सांगितले. दरम्यान आपल्यावर हल्ला झाल्यावर दुचाकीसह आपण कोसळलो व दुचाकीच्या मोठ्याने झालेल्या आवाजाने बिबट्या तेथून पळून गेला. जखमी खान यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेनंतर शेत-शिवारात केळी कापणीकरीत भीतीपोटी मजुर येणार नाही म्हणून आपल्यावर बिबट्याने नव्हे तर लांडग्याने हल्ला केला, असा घूमजावदेखील खान यांनी केला,





