ग्राहकांना सुखद दिलासा : सोन्याच्या भावात किंचित घसरण
Pleasant relief for consumers: Slight decline in gold prices जळगाव (4 एप्रिल 2025) : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सोने दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. जळगाव सुवर्णगरीत सोने दरात तोळ्यामागे 300 रुपयांची तर चांदीत किलोमागे तब्बल 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे.
शुक्रवारी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 83,786 रुपये इतका होता. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 91400 रुपये, जीएसटीसह हा दर 94,142 रुपये होता. चांदीचा दर 2 हजारांनी घसरून किलोला 99 हजार रुपयावर पोहोचला आहे.


