जळगाव-सुरत रेल्वे लाईनवरील मालगाडीतून चोरट्यांनी 78 लाखांची खते लांबवली


Thieves steal fertilizers worth Rs 78 lakh from a goods train on the Jalgaon-Surat railway line जळगाव (4 एप्रिल 2025) :  जळगाव-सुरत रेल्वे लाइनवर उभ्या मालगाडीच्या दरवाजाचे सील तोडून 78 हजार रुपये किमतीच्या 127 खतांच्या गोण्या तीन चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपळकोठा येथील योगेश दिलीप बडगुजर याने त्याच्या अन्य दोन साथीदारांसह हा गुन्हा केला. दिलीपसह विशाल पाटील व लीलाधर बडगुजर या त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. आरपीएफ ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक शिवपूजन सिंह, एस. बी. चौधरी, पंकज वाघ, विनोद जेठवे यांनी ही कारवाई केली.
.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !