कोट्यवधी ग्राहकांना महावितरणकडून एप्रिल फुल ! वीज दर कपातीला अखेर स्थगिती
जळगाव (5 एप्रिल 2025) : महावितरणच्या वीज दर कपातीच्या आदेशाला महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानेच स्थगिती दिली आहे. नवा आदेश येईपर्यंत आता ग्राहकांना महावितरणच्या जुन्याच दराने वीज बिल भरावे लागणार आहे. महावितरणने 2025-26 ते 2029-30 या कालावधीसाठी दर निश्चिती याचिका दाखल केली होती. वीज नियामक आयोगाने त्यावर निर्णय घेत 28 मार्च रोजी वीज बिलात 7 ते 10 टक्के कपात करण्याचा निर्णय दिला होता.
1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणीही होणार होती. मात्र महावितरण दरवाढीच्या हट्टावर कायम राहिली. कंपनीने फेरविचार करण्यासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे आयोगाने आपल्याच आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे वीज बिल कपातीचा निर्णय ग्राहकांसाठी एप्रिल फूलच ठरला. निर्णय लागू झाला असता तर 1 ते 100 युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी 4.71 रुपये ऐवजी 4.43 रुपये दर आकारला जाणार होता. प्रतियुनिट 28 पैशांची बचत होणार होती. तर 101 ते 300 युनिटपर्यंतच्या स्लॅबमध्येही प्रतियुनिट 10.29 रुपयेऐवजी 9.64 रुपये दर आकारला जाणार होता. यानुसार युनिटमागे 65 पैशांची बचत झाली असती.
..


