दारू न पाजल्याने चौघांना बेदम मारहाण : सावखेड्यातील घटना
जळगाव (5 एप्रिल 2025) : दारू पाजली नाही म्हणून कुटुंबातील चौघांना चापटा-बुक्क्यांनी, लाकडी काठीने बेदम मारहाण केली. तसेच मोबाइल फोडून टाकला. मंगळवारी (1 एप्रिल) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना सावखेडा येथील जय भीम वाडा परिसरात घडली.
या प्रकरणी दीपक रमेश सोनवणे (वय 45, रा. सावखेडा) यांच्या तक्रारीनुसार अनिल अशोक सोनवणे, सागर सोनवणेसह चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी (3 एप्रिल) गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार सूर्यकांत नाईक हे तपास करीत आहेत.


