बोरनार महाविद्यालयात चोरीने खळबळ
Theft causes stir in Bornar College जळगाव (5 एप्रिल 2025) : कार्यालयाचे कुलूप तोडत चोरट्यांनी आत एण्ट्री केली. लोखंडी कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी कागदपत्रं, रजिस्टर, रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना बोरनार (ता.जळगाव) येथील सुयोग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयात गुरुवारी (3 एप्रिल) सकाळी सात वाजता उघडकीस आली.
चोरट्यांनी माध्यमिक शाळेला बुधवारी रात्री लक्ष्य केले. कार्यालयाचे कुलूप तोडत आतमध्ये एण्ट्री केली. कार्यालयातील लोखंडी गोदरेज कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील दस्तऐवज, रोकड घेत पसार झाले.
सर्व्हिस बुक, सर्वमान्यता मूळ नस्ती, बिंदू नामावली रजिस्टर, पगार रजिस्टर, परीक्षा फी पावती बुक, इयत्ता पाचवी ते सातवीचे मान्यता प्रस्ताव, मूळ नस्ती, वर्ग मान्यता नस्ती, रोख दोन हजार, साडेचार हजार किमतीचा सीपी प्लस डिव्हिआर, असा एकूण 6500 रुपये किमतीचा ऐवज लांबविला.
या प्रकरणी मुख्याध्यापक शिवाजी पाटील (वय 56, रा. दादावाडी मागे जळगाव) यांच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार प्रदीप पाटील हे तपास करीत आहेत.


