जळगावात कामाला जाते म्हणत बाहेर पडलेली तरुणी अचानक झाली बेपत्ता
A young woman who went out to work in Jalgaon suddenly went missing जळगाव (5 एप्रिल 2025) : कामाला जाते,असे कुटुंबियांना सांगुन घराबाहेर पडलेली अठरा वर्षीय तरुणी बेपत्ता झाली. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा ते बारा वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार गुरुवारी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. हवालदार निलेश पाटील हे तपास करीत आहेत.


