ओमनी-दुचाकी अपघात : यावलचे तिघे जखमी


Omni-two-wheeler accident : Three injured in Yaval जळगाव (5 एप्रिल 2025) : भरधाव ओमनी व दुचाकी यांच्यात धडक होऊन तीन जण जखमी झाले. शुक्रवारी दुपारी ही घटना कोळन्हावी फाट्याजवळ घडली. प्राथमिक उपचाराअंती तिघांना अधिकच्या उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले.

फरहान खान (19), सुलेमान खान (19), लाल मोहम्मद (19, तिघे रा.यावल) असे जखमींची नावे आहेत. ही वार्ता कळाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत जखमींच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.


कॉपी करू नका.
WhatsApp Group