29 वर्षीय विवाहितेवर पतीकडून अनैसर्गिक अत्याचार : सासर्यासह नंदोईवरही आरोप
29-year-old married woman subjected to unnatural torture by her husband : Accusations against Nandoi along with father-in-law यावल (5 एप्रिल 2025) : शहरातील माहेर असलेल्या एका 29 वर्षीय विवाहितेवर पतीने बांधकाम व्यवसायासाठी माहेरून 25 लाख रुपये आणले नाही या रागातून अनैसर्गिक अत्याचार केला तसेच सासरे आणि नंदोई यांनी देखील तिच्यावर बलात्कार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला मारून टाकू, तुझ्या भावाला आणि वडिलांनादेखील मारून टाकू, अशी धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहे नेमके प्रकरण
शहरातील माहेर असलेल्या 29 वर्षीय पिडीत विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह भुसावळ शहरातील तरुणासोबत झाला होता. या तरुणाने तिला बांधकाम व्यवसायासाठी माहेरून 25 लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. तिने पैसे न आणल्याने या रागातून पतीने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला तसेच पतीच्या कामासाठी पैसे आणत नाही या रागातून तिचे सासरे आणि नंदोई या दोघांनीदेखील या पीडित विवाहितेवर अत्याचार केला.
हा प्रकार जर तू कोणाला सांगितला तर तुला, तुझ्या वडिलांना आणि भावाला मारून टाकू, अशी धमकी दिली. ही घटना 11 ऑक्टोबर 2020 ते 9 ऑगस्ट 2021 दरम्यान घडली होती. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.


