महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी कारवाईचा दंडुका : तीन महिन्यात 51 लाखांचा दंड वसुल


Action taken to prevent accidents on highways : Fines of Rs 51 lakh collected in three months जळगाव (6 एप्रिल 2025) : राष्ट्रीय महामार्ग व अन्य मार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या दरम्यान पाळधी केंद्र महामार्ग पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली. यात 6,593 चालकांवर केलेल्या कारवाईतून 51 लाख 23 हजार 100 रुपयांचा दंड वाहन चालकांनी भरला.

विना हेल्मेट दुचाकी चालविणारे 2,720 चालक, ट्रीपलशीट दुचाकी चालविणारे 387 चालक, विना शिटबेल्ट वाहन चालविणारे 518 चालक, अपघातास कारणीभूत असणारे चमकदार लाईट वाहनास लावणारे 676, महामार्गावर दारू पिऊन वाहन चालविणार्‍या सहा वाहन चालकांना न्यायालयाने प्रत्येकी दहा हजार रुपये दंड आकारला. हा दंड चालकांनी भरला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई वाहतूकचे अपर पोलीस महासंचालक छेरिंग दोर्जे, ठाणे
महामार्ग पोलीस अधीक्षक रूपाली अंभुरे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पाळधी महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक मोहम्मद सैयद तसेच सहकारी अंमलदार यांनी केली. या पुढेही महामार्गावर कारवाई सुरू राहणार आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून मार्गावर सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन पाळधी केंद्र महामार्गाचे उपनिरीक्षक मोहम्मद सैयद यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !