जळगावात धूम स्टाईल महिलेच्या गळ्यातील मंगलपोत लंपास


Dhoom style lamp removed from woman’s neck in Jalgaon जळगाव (6 एप्रिल 2025) : दोन महिला रस्त्याच्या कडेला पायी चालत जात असता पाठीमागून पायी आलेल्या भामट्याने एका महिलेच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाची सुमारे 48 हजार किंमतीची सोन्याची मंगलपोत हिसकावली. लागलीच तो रस्त्याने पळत पसार झाला. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना शहरातील का.उ.कोल्हे विद्यालयाच्या मागील गेटजवळ जुना खेडी रस्त्यावर घडली.

मनीषा विनोद बारी (46, रा.स्वप्नशील अपार्टमेंटजवळ, जुना खेडी रोड) या गृहिणी शेजारील उषा पुंडलिक देवरे यांच्यासह दोन्ही रस्त्याच्या कडेने बोलत जात असताना या महिलांच्या पाठीमागून अंदाजे 25 वर्षीय संशयित तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत त्यांच्याजवळ आला. त्याने मनीषा बारी यांच्या गळ्यातील मंगलपोत हिसकावून घेत पलायन केले. या प्रकरणी तक्रारीनुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी जात माहिती जाणली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !