हॉर्न वाजवल्याच्या रागातून दुचाकीस्वाराच्या डोक्यात घातला दगड


Stone thrown at biker’s head in anger over horn honking जळगाव (6 एप्रिल 2025) : हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने दुचाकी थांबवित संशयिताने दुचाकी चालकाशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. त्यानंतर रस्त्यावर पडलेला दगड उचलत कपाळावर मारला. यात दुचाकी चालक संजय भास्कर पाटील (वय 33, रा.धानवड) हे जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास धानवड (ता.जळगाव) येथे भवानी माता मंदिराजवळ घडली.

तक्रारीनुसार याप्रकरणी जयेश सुभाष वंजारी (रा.चिंचोली, ता.जळगाव) याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. हवालदार मुकुंद पाटील हे तपास करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !