जळगावातील बनावट जन्म-मृत्यू दाखल प्रकरण : दोन वकिलांना अटक


Fake birth and death registration case in Jalgaon : Two lawyers arrested जळगाव (7 एप्रिल 2025) : जळगाव महानगरपालिकेत जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आलेल्या दाखल्यांमध्ये तहसीलदार यांच्या सही व शिक्क्याचे बनावट अर्ज आल्याप्रकरणी चौकशीदरम्यान 43 जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून दोन मुख्य वकीलांना अटक करण्यात आली आहे. संशयीतांना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावल्याची माहिती जळगाव पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी दिली.

बनावट स्वाक्षरीसह शिक्क्यांचा वापर
जळगाव महानगरपालिकेमध्ये जन्ममृत्यू नोंदणी विभागामध्ये तहसील कार्यालयातून 50 दाखल्यांसाठी प्रमाणपत्र आले होते. या प्रमाणपत्रांवर असलेले तहसीलदार यांचे सही व शिक्के हे बनावट असल्याचा संशय जन्ममृत्यू नोंदणी विभागाला आला होता. याप्रकरणी तहसीलदारांना पत्र लिहून चौकशीची मागणी करण्यात आली. तहसीलदार शीतल राजपूत यांनी चौकशी करून याप्रकरणी नायब तहसीलदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात 43 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन वकिलांना अटक
या प्रकरणाचा बांग्लादेशाशी संबंध जोडल्या जात असल्याने शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात येऊन पोलिसांनी या प्रकरणातील 43 जणांची तपासणी करून संशयित आरोपी वकील शेख मोहम्मद रईस बागवान (रा. शाहूनगर, जळगाव), शेख मोहसीन शेख सादिक (मणियार पिंप्राळा, जळगाव) यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !