सारोळा येथे धाडसी घरफोडी : 63 हजारांचा ऐवज लंपास


Daring house burglary in Sarola : Property worth Rs 63 thousand looted मुक्ताईनगर (8 एप्रिल 2025) : बंद असलेल्या घराची कडी उघडत चोरट्यांनी घरातील 63 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना सारोळा येथे 5 ते 6 दरम्यान घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामसिंग उत्तम गोपाळ (55, सारोळा) हे शेतकरी असून सारोळा येथे परिवारासह वास्तव्यास आहेत. 5 रोजी रात्री नऊ ते 6 रोजी सकाळी 4.15 दरम्यान चोरट्यांनी जुन्या बंद घराची कडी उघडत आत प्रवेश केला. कपाटातून चोरट्यांनी सात ग्रॅम वजनाचे व 61 हजार 800 रुपये किंमतीची सात ग्रॅम वजनाची पोत व पाच ग्रॅमची अंगठी तसेच एक हजार रुपये किंमतीचे लहान मुलांच्या हातातील कडे लांबवले. चोरीचा प्रकार लक्षात येताच शेतकर्‍याने पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास नाईक नंदकिशोर धनके करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !