नाशिक हादरले : पत्नी माहेरून येत नसल्याने संतापलेल्या नवर्‍याने पेटवून घेत सासु व पत्नीला मारली मिठी

पतीचा होरपळून मृत्यू तर सासू गंभीर जखमी : सोनेरी गावातील प्रकार


 सिन्नर (8 एप्रिल 2025) l माहेरी आलेली पत्नी सासरी येत नसल्याने मित्रांसह पती सासरी आला व पत्नीला घरी नेण्यासाठी आग्रह धरत असताना तिने नकार दिल्यानंतर पतीने अंगावर पेट्रोल ओतले व सासू व पत्नीला मिठी मारून ठेवल्याने होरपळून पतीचा मृत्यू झाला तर आई व मुलगी दोन्ही गंभीर जखमी झाल्या. सिन्नर तालुक्यातील सोनेरी गावात ही घटना घडली.

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे तर पत्नी-सासू गंभीर असून त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मयत पती व त्याच्या चार मित्रांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. केदारनाथ हांडोरे (24) असे मृत पतीचे नाव आहे.


केदारनाथ हांडोरे व स्नेहल शिंदे यांचा गेल्यावर्षी विवाह झाला होता. काही दिवसांपूर्वी स्नेहल आणि केदारनाथ यांच्यात वाद झाला त्यामुळे स्नेहल तिच्या माहेरी म्हणजे सोनेरी येथे राहण्यासाठी आली होती. रविवारी रात्री 12 च्या सुमारास केदारनाथ हांडोरे व त्याचे मित्र हरिश डुंबरे, कृष्णा थोरात, गणेश थोरात, विशाल तुपसुंदर हे सोनेरी येथे गेले होते. यावेळी स्नेहल आणि तिची आई अनिता यांच्यासोबत केदारनाथने वाद घातला. चाकूचा धाक दाखवत स्नेहलला पळवून नेण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त झालेल्या केदारनाथ याने स्वत:ला पेटवून घेतले आणि त्याच अवस्थेत स्नेहल आणि सासू अनिता यांना मिठी मारली. यात स्नेहल आणि अनिता शिंदे गंभीर भाजल्या.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !