धुळ्यातील कुविख्यात गुंड सत्तार मेंटलसह टोळीविरोधात ‘मोक्का’


‘Mokka’ against notorious gangster Sattar Mantal and his gang from Dhule  धुळे (8 एप्रिल 2025) : धुळे शहरातील कुविख्यात गुंड सत्तार मेंटल व त्याच्या चार साथीदारांविरोधात मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याला (गुरनं.34/25) मोक्का लावण्यास नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक यांनी मंजुरी दिली आहे. सत्तार मेंटल हा पोलिसांच्या ताब्यात असून टोळीतील सदस्यांचा आता पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे. या कारवाईने धुळ्यातील गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे
संशयीत सत्तार मेंटलविरोधात खून करणे, गंभीर दुखापत करणे, सरकारी नोकरांवर हल्ला करणे, शासकीय कामकाजात अडथळा आणणे यासह गंभीर स्वरूपाचे 43 गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे आरोपी सत्तार हा संघटीत पद्धत्तीने गुन्हेगारी करीत असल्याने गेल्या दहा वर्षात त्यांच्या टोळीविरोधात 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. आरोपीसह त्याच्या टोळीविरोधात मोकान्वये कारवाई करण्यासाठी मोहाडी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या माध्यमातून विशेष महानिरीक्षकांकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली आहे.

या संशयीताना लागला ‘मोक्का’
सत्तार मासुम पिंजारी उर्फ सत्तार मेंटल (स.ना.हायस्कूलजवळ, अंबिकानगर, धुळे), सोहेल मेहमूद शेख, अज्जू कादर मणियार, शाहरूख शेख मुनीर उर्फ शाहरूख डीओ, नाजीम अब्दुल रहमान मलिक उर्फ नाजीम कबुतर या संशयीतांना मोक्का लागला आहे. मोहाडी पोलिसात दाखल गुरंन.34/25 ला मोक्का लावण्यास नाशिक विेशेष महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार उपासे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, मोहाडी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, हवालदार संदीप कदम, नाईक किरण कोठावदे, गुन्हे शाखेचे सतीश जाधव, हवालदार संतोष हिरे, हवालदार प्रशांत चौधरी, कॉन्स्टेबल हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.

गुन्हेगारी टोळ्यांवर लवकरच कारवाई
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे म्हणाले की, शहरातील अन्य गुन्हेगारी टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर लवकरच कठोर कारवाई करण्यात येईल.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !