जळगावातून चोरट्यांनी 12 लाखांची महागडी कार लांबवली


Thieves steal expensive car worth Rs 12 lakh from Jalgaon जळगाव (9 एप्रिल 2025) : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असतानाच चोरट्यांनी आता महागडी कारही लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील डी लाईट अपार्टमेंटमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजता ही घटा घडली. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके ?
जळगाव शहरातील निमखेडी रोडवरील डी लाईट अपार्टमेंट येथे निलेश रमेश पाटील (30) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शासकीय कंत्राटदार म्हणून ते काम करतात. सोमवार, 7 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता त्यांनी त्यांची कार क्रमांक (एम.एच.19 सी.झेड.8200) ही अपार्टमेंटला पार्कींगला लावलेली होती. पार्कींगला लावलेली 12 लाख रूपये किंमतीची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून कार काढून पोलीस स्टेशनसमोरून थेट हायवेवर नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते. या घटनेचा व्हिडिओ कारमालक रमेश पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !