कोयता-सुर्याद्वारे जळगावात दहशत निर्माण करणार्या दोघांना बेड्या
Two arrested for creating terror in Jalgaon with scythes and knives जळगाव (10 एप्रिल 2025) : कोयता तसेच सुरा हातात घेत दहशत माजविणार्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
रोहित विलास निकम (वय 18,रा.गेंदालाल मिल) हा दाणा बाजार परिसरात रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दहशत किंवा गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या वावरत होता. पोलिसांनी त्याच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत करत त्याला अटक केली. याप्रकरणी आर्मक्टनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार सतीष पाटील तपास करीत आहेत.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच कमलेश सुरेश पवार (21, रा.साईनगर एमआयडीसी) हा रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दाणा बाजार दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ लोखंडी सुरा बाळगताना पोलिसांना आढळुन आला. त्याच्याकडील सुरा हस्तगत करत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. हवालदार उमेश भांडारकर तपास करीत आहेत


