भुसावळ रेल्वे स्थानकावर अनोळखी तरुणाचा मृत्यू


Unidentified youth dies at Bhusawal railway station जळगाव (10 एप्रिल 2025) : प्रकृती अत्यवस्थ झालेल्या अंदाजे तीस ते पस्तीय वर्षीय तरुणाचा उपचार घेताना सोमवारी (7 एप्रिल) साडेपाच वाजेपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. हा अनोळखी तरुण शुक्रवारी भुसावळ रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक एक वर रेल्वेच्या प्रतिक्षेत होता. अचानक झटका येऊन तो कोसळला.

भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्याची सोमवारी प्रकृती अत्यवस्थ होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ओळख पटवून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तपास हवालदार महेश पराते हे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !