रामनवमीची शोभायात्रा पाहताना महिलेची पाच ग्रॅमची सुवर्णपोत लांबवली


A woman’s five-gram gold necklace was held up while watching the Ram Navami procession जळगाव (10 एप्रिल 2025) : रामनवमी निमित्त निघालेली शोभायात्रा पाहणार्‍या महिलेची पर्स भामट्याने लंपास केली. या पर्समध्ये 35 हजार किमतीचे पाच ग्रॅम वजनाची मंगलपोत, साडेतीन हजार रोकड असा सुमारे 38 हजार 500 रुपयांचा महिलेने ठेवलेला मुद्देमाल भामट्याने चोरुन नेला.ही घटना रविवारी ( 6 एप्रिल) सायंकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान शहरातील दाणाबाजार येथे रस्त्यावर घडली.

या प्रकरणी सुनिता एकनाथ वाणी (वय 50,रा. पाटीलवाडा, जुने जळगाव) यांच्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार योगेश पाटील हे तपास करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !