भुसावळात रेल्वे मंडळात 112 सहाय्यक लोकोपायलट सेवेत दाखल

ऐतिहासीक उपलब्धी : वेळेत निवड प्रक्रिया पूर्ण करणारे भुसावळ मंडळ ठरले प्रथम


112 Assistant Loco Pilots join service in Bhusawal Railway Board भुसावळ (10 एप्रिल 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात 112 सहाय्यक लोकोपायलट प्रशिक्षणार्थी सेवेत रूजू झाले आहेत. लोको रनिंग श्रेणीतील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या रिक्त पदांचा अनुशेष भरण्यात यश आले असून वेळेत निवड प्रक्रिया पूर्ण करणारे भुसावळ मंडळ प्रथम ठरले आहे. रेल्वे सेवेत दाखल झालेल्या सहाय्यक लोकोपायलट यांचा भुसावळ विभागाच्या डीआरएम ईती पाण्डेय यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

पाच वर्षानंतर रिक्त पदांचा प्रश्न सुटला
लोको रनिंग श्रेणीतील रिक्त पदांचा मुद्दा 2019 पासून प्रलंबित होता. विभागीय कोट्यातून या पदांची भरती करण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र पात्रता संबंधित अटींमुळे निवड प्रक्रिया फक्त टीआरएस श्रेणीतील तंत्रज्ञांपुरती मर्यादित होती. परिणामी 31 मे 2023 रोजी 175 सहायक लोको पायलट पदांसाठी एक अधिसूचना जारी केली गेली, मात्र त्या प्रक्रियेत केवळ दोन उमेदवारांची निवड करण्यात यश आहे. भुसावल मंडळाने या समस्येचे निराकरण करण्यासाठी सक्रिय पावले उचलली तर 8 एप्रिल 2024 रोजी रेल्वे बोर्डाने शिथिलता दिल्यानंतर सर्व विभागीय कर्मचारी जे आवश्यक पात्रता पूर्ण करतात ते सहायक लोको पायलट पदांसाठी अर्ज करू शकले. 16 मे 2024 रोजी 173 लोको पायलट पदांसाठी नवीन अधिसूचना जारी करण्यात आली.


विविध विभागातून 923 उमेदवारांनी केला अर्ज
एकूण 923 उमेदवारांनी इंजिनियरिंग, सिग्नल आणि टेलीकॉम, ऑपरेटिंग, इलेक्ट्रिकल (सामान्य) आणि टीआरडी विभागांमधून या पदांसाठी अर्ज केला. 28 जुलै 2024 रोजी घेतलेल्या लेखी परीक्षेत 161 उमेदवार उत्तीर्ण झाले. मेडिकल परीक्षा तातडीने पूर्ण केली गेली, त्यानंतर 23 ते 26 सप्टेंबर 2024 दरम्यान मनोवैज्ञानिक परीक्षण घेण्यात आले.

112 कर्मचार्‍यांना मिळाली नियुक्ती
161 उमेदवारांपैकी ज्यांनी दोन्ही मनोवैज्ञानिक परीक्षण आणि मेडिकल परीक्षा उत्तीर्ण केली त्या 131 उमेदवारांना प्रारंभिक सहायक लोको पायलट प्रशिक्षणासाठी भुसावळातील झोनल प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले. 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालेले प्रशिक्षण 1 एप्रिल 2025 रोजी संपले. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर 112 योग्य सहायक लोको पायलट यांना 3 एप्रिल 2025 रोजी नियुक्ती आदेश जारी करण्यात आले.

कर्मचार्‍यांसाठी भुसावळात परिचय सत्र
नवीन प्रशिक्षित सहायक लोको पायलटसाठी 9 एप्रिल 2025 रोजी भुसावल मंडळ ट्रेनिंग सेंटरमध्ये एक परिचयात्मक सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात विभागीय रेल्वे व्यवस्थापक ईती पाण्डेय, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता/टीआरओ आणि वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक उपस्थित होते. नूतन सहायक लोको पायलट्स यांना सुरक्षित आणि कुशल ट्रेन ऑपरेशनमधील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका यावेळी समजावून सांगून प्रोत्साहित करण्यात आले.

रेल्वे संचालन होणार सुलभ : डीआरएम
112 सहायक लोको पायलट यांच्या निवडीमुळे भुसावळ मंडळात कर्मचार्‍यांची कमतरता दूर होणार आहे. ही उपलब्धी भुसावल मंडळाच्या रेल्वे संचालनास सुलभपणे चालवण्यासाठी आणि प्रवासी सेवांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी असलेल्या बांधिलकीला अधोरेखित करते, असे डीआरएम ईती पाण्डेय म्हणाल्या.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !