साकळीजवळ दुचाकी अपघात : यावलच्या महिलेचा मृत्यू


यावल (11 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील साकळी गावाच्या बसस्थानकाजवळ दुचाकीद्वारे 55 वर्षीय महिला यावलला येत असताना दुचाकी चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडला व महिला ठार झाली. या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवारी दुचाकी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

साकळी गावातील बस स्थानकाजवळ अंकलेश्वर बर्‍हाणपूर राज्य मार्गावरून लोटन भास्कर पाटील (रा.मनवेल) यांच्या दुचाकी (क्रमांक एम.एच.54 ए. 7324) मागे बसून अरुणा सुधाकर पाटील (55, रा.तिरुपती नगर, यावल) या येत होत्या. लोटन पाटील यांनी निष्काळजीपणाने दुचाकी भरधाव वेगात चालवल्याने अपघात घडला आणि अपघातात अरुणा पाटील यांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सुधाकर पाटील यांच्या फिर्यादीवरून लोटन पाटीलविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !