भुसावळ शहर पोलिसांची कारवाई : मेथाजी मळा भागातून चारचाकी लांबवणार्‍या कुविख्यात चोरट्यांना बेड्या

संशयीतांनी वाहनाची लावली भंगारात विल्हेवाट : तिसर्‍या संशयीताचा कसून शोध


Bhusawal city police action : Notorious thieves who stole four-wheelers from Methaji Mala area arrested भुसावळ (11 एप्रिल 2025) : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेथाजी मळा भागातून चोरट्याने जुलै 2024 मध्ये महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ लांबवली होती. शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली मात्र संशयीतांनी हे वाहन अन्य एका संशयीतास विक्री केल्यानंतर त्याची भंगारात विल्हेवाट लावल्याने आता तिसर्‍या आरोपीच्या अटकेनंतर या गुन्ह्याची पूर्णपणे उकल होणार आहे.

यवतमाळ येथून आरोपीला बेड्या
शहर हद्दीतील वाहन चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यवतमाळ जिल्ह्यातील अवधूतवाडी येथून आरोपी प्रफ्फुल गजानन गांगेकर यास अटक केली. आरोपीच्या अटकेकामी स्थानिक पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात आली. आरोपीच्या चौकशीत त्याने भुसावळातून चोरलेले वाहन नागपूरातील साथीदार सैफुद्दीन खान (नागपूर) यास दिल्याची कबुली दिल्यानंतर त्यासदेखील अटक करण्यात आली मात्र आरोपीने चोरीनंतर हे वाहन अन्य एका संशयीताला भंगारात (स्क्रॅप) विक्री केल्याची कबुली दिल्याने आता पोलिसांकडून तिसर्‍या संशयीताचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. तपास एएसआय विनोद नेवे करीत आहे.


यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमाकांत पाटील, संदीप पालवे, पोलीस शिपाई राहुल भोई आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !