इन्ट्रीच्या नावाखाली पाचशे रुपयांची लाच भोवली : देवरी नाक्यावर आरटीओसह तिघे नाशिक एसीबीच्या जाळ्यात


Three including RTO caught by Nashik ACB at Deori checkpoint नाशिक (11 एप्रिल 2025) : वाहनांना सीमा तपासणी नाक्यावर इन्ट्री देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागून ती खाजगी दोन चालकांच्या माध्यमातून स्वीकारणार्‍या नागपूरातील आरटीओ निरीक्षकाला नाशिक एसीबीने अटक केली. शिरपूर देवरी आरटीओ सीमेवर ही कारवाई शुक्रवार, 11 रोजी करण्यात आली.

आरटीओ अधिकार्‍यासह तिघांना अटक
नागपूर ग्रामीणचा मोटार वाहन निरीक्षक योगेश गोविंद खैरनार (46, फ्लॅट नंबर 107, पहिला मजला, रचना युथिका अपार्टमेंट, अमरावती रोड, पोस्टल कॉलनी जवळ, नागपूर) तसेच खाजगी चालक नरेंद्र मोहनलाल गडपायले, (63, बुद्ध विहारच्या मागे, नारायण लॉन्स जवळ, मराळटोली, आझाद वार्ड, गोंदिया) व खाजगी चालक आश्लेष विनायक पाचपोर (45, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेजच्या समोर, गाडगेबाबा मंदिराच्या मागे, गाडगे नगर, अमरावती) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.


असे आहे लाच प्रकरण
32 वर्षीय तक्राररदाराचा माल वाहतुकीचा ट्रेलर हा भंडारा देवरी मार्गे रायपूरकडे जात असताना शुक्रवारी आरटीओ सीमा तपासणी नाका, शिरपुर, देवरी येथे आल्यानंतर आरोपी नरेंद्र गडपायले यांनी एन्ट्री द्यावी लागेल म्हणून पाचशे रुपयांची लाच मागून ती आश्लेष पाचपोरकडे दिली.

इन्ट्रीच्या नावाखाली वाहनधारकांची लूट
आरटीओ अधिकारी योगेश गोविंद खैरनार यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने इंटरसेप्टर -5 ( रस्ता सुरक्षा पथक ) येथे नेमलेले असताना प्रादेशिक परीवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण यांच्या मौखिक आदेशाने ते शिरपूर, देवरी आरटीओ सीमा तपासणी नाका येथे उपस्थित राहून खाजगी पंटराच्या माध्यमातून वाहन चालकांकडून वसुली करीत होते व खाजगी पंटरांच्या माध्यमातून त्यांनी पाचशे रुपयांची लाच स्वीकारताच त्यांनाही अटक करण्यात आली. तीन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याविरोधात देवरी पोलीस ठाणे, जि.गोंदिया येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे आदींच्या पथकाने यशस्वी केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !