49 लाखांच्या फसवणूक प्रकरणी चाळीसगावातील भामट्याला दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या


Delhi Police arrests a bum from Chalisgaon in a fraud case of Rs 49 lakhs चाळीसगाव (11 एप्रिल 2025) : दिल्ली येथे 49 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात स्थानिक पोलिसांच्या मदतीने चाळीसगाव शहरातील वॉण्टेड संशयीताला अटक करण्यात आली. पुष्कर चंद्रकांत पखाले (रा.करगाव रोड, चाळीसगाव, जि.जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
दिल्ली येथील सायबर पोलीस स्टेशन (दक्षिण) येथे गु. नो. क्र. 0015/2025 कलम 318(4),319(2),61(2),3(5) सह 66(उ), 66( ऊ) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात चाळीसगावातील संशयीत पुष्पक पखाले याने 49 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांना संशयीत चाळीसगाव असल्याची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली. अधिक कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला दिल्ली येथे हलवण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !