चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी : पातोंड्यात जबरी लूट करणार्‍या परभणी जिल्ह्यातील दरोडेखोरांना बेड्या

चाळीसगाव शहरातील चोरीचीही उकल : अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता


Chalisgaon City Police चाळीसगाव (11 एप्रिल 2025) : चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे भरदिवसा वयोवृद्धाला धमकावत भामट्यांनी 42 हजार 500 रुपयांचा ऐवज लूटला होता. बुधवार. 9 रोजी घडलेल्या जबरी लूट प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल होता. चाळीसगाव शहर पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करीत परभणी जिल्ह्यातील तीन आरोपींच्या टोळीला अटक केली आहे तर अन्य एका अल्पवयीनालाही ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या अटकेनंतर चाळीसगाव शहरातील चोरीची उकल झाली असून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पातोंडा गावात केली भर दिवसा जबरी लूट
पातोंडा गावातील रहिवासी अनुसया रघुनाथ माळी (60, शेषनाग गल्ली पातोंडा) यांच्या घरी बुधवार, 9 रोजी आरोपींनी घरात बळजबरीने प्रवास करीत वृद्धेला दमबाजी करीत अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून 42 हजार 500 रुपयांचा ऐवज लूटला होता. पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे टोळीला बेड्या ठोकल्या. आरोपींनी चाळीसगाव शहरात चोरी केल्याची कबुली देत त्यातील हजारांचा मुद्देमाल काढून दिला आहे. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

या आरोपींना अटक
अमोल कडबा भोसरे (20), शरद सुधाकर चव्हाण (20), सुधीर मल्लप्पा चव्हाण (20) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर अभिशेख भोसले (सर्व रा.मगंरुळ तांडा, ता.जितूर, जि.परभणी) हा पसार झाला आहे शिवाय एका अल्पवयीनाला ताब्यात घेतल्यानंतर त्यास बाल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अटकेतील आरोपींकडून 78 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक राजेशसिंह चंदेल, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, हवालदार अजय पाटील, राकेश पाटील, राहुल सोनवणे, योगेश बेलदार, विजय पाटील, नरेंद्र चौधरी आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !