सैनिकांच्या वेतनासह भत्त्यांसाठी लाचखोरी : 15 अधिकार्यांविरोधात सीबीआय पथकाकडून गुन्हे दाखल
Bribery for soldiers’ salaries and allowances: CBI team files case against 15 officers नाशिक (12 एप्रिल 2025) : सैन्यातील जवानांच्या वेतनासह भत्त्यांतील फरक तसेच पेन्शन मंजुरीतील फरकासाठी प्रत्येकी पाच ते आठ लाखांपयर्ंंत लाच मागणार्या 15 लेखांधिकार्यांविरोधात सीबीआयच्या एसीबी पथकाने गुन्हे दाखल केले आहेत.
देशात पहिल्यांदाच एकाच वेळी लेखा विभागातील तब्बल 15 अधिकारी व कर्मचार्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यांच्याविरोधात दाखल झाले गुन्हे
सहायक लेखाधिकारी अनुप पटेल, अश्विनी पांडे, कुशाल साहू, सुमीत जैन, जितेंद्रकुमार मीना
तर लेखापरीक्षक विकासकुमार मीना, मोहित स्वामी, सुमीत पुनिया, अजयकुमार, रवी दाणोडिया, अमितकुमार मीना, नवीनकुमार मीना, लोकेशकुमार मीना
क्लर्क विकासकुमार सिंग, मेघराज मीना अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत.




