नशिराबादच्या कंपनीत तीन लाखांचा कच्चा माल चोरला : भुसावळसह सांगवीतील तत्कालीन कर्मचार्याला बेड्या
Raw materials worth three lakhs stolen from a company in Nashirabad : Former employee from Bhusawal and Sangvi handcuffed नशिराबाद (12 एप्रिल 2025) : कंपनी मालकाचा विश्वास संपादन करीत तीन लाखांचा कच्चा माल गडप करणार्या नशिराबादच्या केमिकल्स कंपनीतील दोन तत्कालीन कर्मचार्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अमित कमलाकर बेंडाळे (रा.सांगवी ता. यावल) व विरेंद्र खुबलाल विश्वकर्मा (रा.खडका, ता.भुसावळ) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहे. संशयीतांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
असे आहे फसवणूक प्रकरण
नशिराबाद शिवारात सुयोग सुधाकर चौधरी (48, रा.एमआयडीसी, जळगाव) यांची सुबोनिया केमिकल्स कंपनी आहे. या कंपनीतील वरील दोघा कर्मचार्यांनी 1 ऑगस्ट 2024 ते 31 जानेवारी 2025 च्या दरम्यान कधीतरी तीन लाख रुपये किंमतीचा कच्चा माल चोरून नेला. सुयोग चौधरी यांनी नशिराबाद पोलिसात शुक्रवारी तक्रार दिल्यानंतर दोघा आरोपींना अटक करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी.मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करीत आहे.


